मुंबई : मनसे नेते अमित ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. कोविड योद्धा असलेल्या निवासी डॉक्टरांच्या पदव्युत्तर परीक्षांबाबत योग्य निर्णय घेण्याची विनंती करणारे पत्र अमित ठाकरे यांनी राज्यपालांना दिले.
वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी निवासी डॉक्टर्स गेले अडीच-तीन महिने प्रचंड तणावाखाली आहेत. सुस्पष्ट धोरणाअभावी परीक्षेची टांगती तलवार त्यांना छळत आहे. ही परीक्षा आता 15 जुलैपासून घेण्यात येणार आहे. हा निर्णय घेताना रुग्णांसाठी 24 तास उपलब्ध राहणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या शारीरिक तसेच मानसिक क्षमतांचा विचारही महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने केलेला नाही असं अमित ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, निवासी डॉक्टरांनी सुचवलेला पर्याय पत्रासोबत जोडत त्यांनी सुचवलेल्या पर्यायाची आपण गांभीर्याने दखल घ्यावी आणि योग्य तो निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी अमित ठाकरे यांनी केली आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“थोरातांची कमळा’ चित्रपट गाजला, आता ‘विखे पाटलांची कमळा’ आला अन् पडला”
आशा सेविकांसाठी अमित ठाकरेंची अजित पवारांकडे ‘ही’ महत्त्वाची मागणी
“यंदाचा गणेश उत्सव कोविड-19 च्या आरोग्य विषयक काळजी घेऊन साजरा करु”
नरेंद्र मोदी हे सरेंडर मोदी आहेत; राहुल गांधीचे पंतप्रधानांवर टिकास्त्र