Home महाराष्ट्र “अमित शहांच्या मुलाची प्रॉपर्टी 10 पटींनी वाढली, ईडी त्यांची चौकशी करणार नाही”

“अमित शहांच्या मुलाची प्रॉपर्टी 10 पटींनी वाढली, ईडी त्यांची चौकशी करणार नाही”

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवर ईडीने छापे टाकले होते. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशी व्हावी याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलं होतं. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत अमित शहांवर निशाणा साधला आहे.

अमित शहांच्या मुलाची प्रॉपर्टी 10 पटींनी वाढली पण त्यांची ईडी चौकशी करणार नाही. या तपासयंत्रणांचा दुरुपयोग भाजप करत आहे. त्याचाच परिणाम आपल्याला राज्यात दिसत असल्याचं नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील आरोप केले आहेत. प्रधानमंत्री सहाय्यता निधीत झालेल्या भ्रष्टाचारावर मोठ्या प्रमाणावर आरोप झाले आहेत. मग त्यांचीही ईडीची चौकशी व्हावी? अशी मागणी नाना पटोलेंनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी –

“पडळकरांची आमदारकी पवारांवर टीका करण्यासाठी, त्यांच्या टीकेचं उत्तर दिलं तर आपली काय लेव्हल राहील”

“शरद पवार देशातील सुसंस्कृत नेतृत्व, पडळकरांनी त्यांच्याविषयी बोलताना काळजी घ्यावी, अशी वक्तव्ये खपवून घेणार नाही”

कुणाचाही आधार घेईन, पण एक दिवस पंतप्रधान नक्की होणार- महादेव जानकर

‘माझं शरद पवारांना आव्हान आहे की…’; गोपीचंद पडळकर आक्रमक