“महाविकास आघाडीला अपवित्र युती म्हणणारे अमित शहा म्हणजे ब्रह्मदेव नाहीत”

0
177

मुंबई : महाविकास आघाडीला अपवित्र युती म्हणणारे केंद्रीय मंत्री अमित शहा म्हणजे काही ब्रह्मदेव नाहीत, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला.

काश्मीरमध्ये तुम्ही मेहबुबा मुफ्ती यांच्याशी युती केली. तेव्हा तुम्ही कुठल्या पवित्र संबंधात जोडले गेले होता?, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केला. प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांनी अमित शहांवर निशाणा साधला.

तुम्ही हे वाचलात का?

माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, की…;राजेश टोपेंचं राज्यातील नागरिकांना आवाहन

दरम्यान, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी कुंभमेळ्यात तुमच्याप्रमाणे अंघोळ करून कोरोनाचा संसर्ग फैलावण्यास मदत केली नाही. आता केवळ कुंभमेळ्यात अंघोळ न केल्यामुळे आम्हाला अपवित्र ठरवले जात असेल तर आम्हाला ते चालेल, असा टोला आव्हाडांनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

“राज्यात 15 दिवसांचा लाॅकडाऊन लागणार”

“काँग्रेस नेते राहुल गांधी कोरोना पाॅझिटिव्ह”

“राज ठाकरेंचे सुपूत्र अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here