Home नागपूर अमित शहा म्हणाले, राजीनामा द्या आणि निवडणूकीला सामोरे जा; आता नाना पटोले...

अमित शहा म्हणाले, राजीनामा द्या आणि निवडणूकीला सामोरे जा; आता नाना पटोले म्हणतात…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

भंडारा : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसीय पुणे दाैऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

हे ही वाचा : “मुख्यमंत्रीही भाजपचाच होणार हे ठरलं होतं, पण ऐनवेळी शिवसेनेने हिंदूत्वाशी तडजोड केली”

‘मी आजही सांगतो, हिंमत असेल तर राजीनामा द्या, दोन हात करा. तिन्ही पक्ष सोबत या, भाजपचा कार्यकर्ता लढण्यासाठी तयार आहे’, असं आवाहन अमित शहा यांनी आघाडी सरकारला दिलं. यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

केंद्र सरकारच्या विरोधात जनतेचा राग असल्यामुळे आधी केंद्र सरकारनं राजीनामा द्यावा. केंद्रातील आणि राज्यातील दोन्ही सरकारं बरखास्त करा आणि निवडणुका घ्या. म्हणजे दूध का दूध, पानी का पानी होईल. लोकशाहीत गृहमंत्र्यांनी असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. लोकशाहीचा सन्मान करायला शिका, असं जोरदार प्रत्युत्तर नाना पटोलेंनी यावेळी दिलं.

महत्वाच्या घडामोडी –

“राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार हरवलंय,शोधून देणाऱ्यास पुरस्कार देऊ”

अमित शहांच्या मदतीसाठी अजित पवार धावून आले, यावर रूपाली पाटील यांची प्रतिक्रिया म्हणाल्या…

देवेंद्र फडणवीसांकडून संयम शिकण्यासारखा; पंकजा मुंडेंनी उधळली स्तुतीसुमने