आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पाथर्डी : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 व अपक्ष 10 आमदारांना सोबत घेऊन बंड केलं. शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेनेत गळती सूरू झाली आहे. मात्र अशातच आता शिवसेनेला मोठा दिलासा मिळाला आहे.
नगर येथील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड यांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा देत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
हे ही वाचा : वेदांता प्रकरणावरून गिरीश महाजनांचा महाविकास आघाडीला टोला, म्हणाले, त्यांना वाईनसाठी…
दरम्यान, पाथर्डी तालुका शिवसेनेचे नवनिर्वाचित तालुकाप्रमुख भगवान दराडे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन तालुक्यातील राजकीय व सामाजिक परिस्थितीची माहिती ठाकरे यांना दिली. यानंतर त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी दक्षिणेतील शेवगाव, पाथर्डी व कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील 10 हजार शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी अर्ज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
महत्त्वाच्या घडामोडी –
लवकरच 50 खोक्यांचा हिशोब सबळ पुराव्यानिशी जाहीर करू; शिवसेनेचा शिंदे गटाला इशारा
मनसेला सोबत घेतल्यास त्याचा युतीला काहीच फायदा होणार नाही- रामदास आठवले