“अमर, अकबर, अँथनी हिट; रॉबर्ट सेठ हरला”

0
302

पुणे : राज्यातील पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश मिळालं. तर भाजपला पराभव सहन करावा लागला. यावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अमर, अकबर, अँथनी या चित्रपटाप्रमाणे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या 3 पक्षाचं कॉम्बिनेशन हिट झालंय, असं सचिन सावंत म्हणाले. तसेच विदर्भातील आपला गड देवेंद्र फडणवीसांना सांभाळता आला नाहीये आणि त्यांना महाराष्ट्राच्या सत्तेची स्वप्ने त्यांना पडतायत, असं म्हणत सावंतांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

दरम्यान, देशाच्या हितासाठी आता भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणं गरजेचं आहे, असं म्हणत सावंतांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

तुमची बडबड बंद व्हावी म्हणून विदर्भातील मतदारांचा महाविकास आघाडीला कौल; शिवसेनेचा फडणवीसांना टोला

टी.नटराजन-युझवेंद्र चहलची घातक गोलंदाजी; भारताचा ऑस्ट्रेलियावर 11 धावांनी विजय

“महाविकास आघाडीला मनात जागा देऊन जनतेनं भाजपला त्यांची जागा दाखवून दिली”

के.एल.राहूल-रविंद्र जडेजाची वादळी खेळी; भारताचे ऑस्ट्रेलियासमोर 162 धावांचे लक्ष्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here