अमर अकबर अँथनी अशी यांची तीन दिशेला तीन तोंडं; रावसाहेब दानवेंचा टोला

0
345

मुंबई : अमर अकबर अँथनी अशी यांची तीन दिशेला तीन तोंडं आहे, असं म्हणत भाजपाचे खासदार आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी एकदा महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

हे तीन पक्षाचे सरकार फार काळ ठिकणार नाही. हे एकमेकांच्या पायात पाय घालूनच पडणार आहे . अमर अकबर अँथनी अशी यांची तीन दिशेला तीन तोंडं आहेत. आम्हाला हे सरकार पाडण्यात काहीही रस नाही, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सिनेमा कितीही खराब असला आणि एकदा तिकीट काढलं, तर माणसांना पूर्ण वेळ बसावंच लागतं. पण कधीकधी प्रेक्षकांमध्ये प्रक्षोभ झाला, तर अनेक चित्रपट बंद पडताना पाहिलेत. आम्ही त्यांच्या चांगल्या कामांना पाठिंबा देऊ, वाईट कामांना विरोध करू, असंही रावसाहेब दानवे म्हणाले .

महत्वाच्या घडामोडी –

“ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राची तब्येत पुन्हा बिघडली, रूग्णालयात केलं दाखल”

नारायण राणेंचं ठरलं: बाळासाहेबांच्या आशीर्वादाने करणार यात्रेची सुरूवात

“उद्धवजी, माझ्या आई-वडीलांना वाचवा; पुण्यातील अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्याची विनवणी”

मोदी नसते तर आज भारताची अवस्थाही अफगाणिस्तानसारखी झाली असती- कंगणा रणाैत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here