आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
कोल्हापूर : महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या सहा जागा बिनविरोध करण्यासाठी धावपळ सुरू होती. यात कोल्हापूरच्या लढतीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. कोल्हापूर विधान परिषदेच्या जागेवर अखेर काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. बिनविरोध करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
हे ही वाचा : नारायण राणेंनी आधी मंत्रिपद सांभाळावं, आणि मग…- विनायक राऊत
भाजपाचे उमेदवार अमल महाडिक यांनी माघार घेतली आहे. अर्ज मागे घेतल्याने सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. पक्षश्रेष्ठींच्या निर्देशाप्रमाणे अमल महाडिक हे समर्थकांसह आज जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज मागे घेण्यासाठी पोहचले.विशेष म्हणजे अमल महाडिक यांना दिल्लीतील वरिष्ठांकडून माघार घेण्याचे निर्देश आले. त्यामुळे महाडिक यांनी पक्षाचा आदेश मान्य करत अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे कळते.
दरम्यान, आता कोल्हापूर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार आहे. आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने चित्र स्पष्ट होणार आहे. अखेर महाडिक यांनी माघार घेतल्याने काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
भाजपचा राष्ट्रवाद बोगस, त्यांना पुन्हा वर्ण व्यवस्था आणायची आहे; नवाब मलिक यांचा आरोप
“मोठी बातमी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी किशोर-राजे निंबाळकर यांची नियुक्ती”
“संप आता लवकरच मिटणार?; एसटी कर्मचारी आणि सरकारमध्ये चर्चेस पुन्हा सूरूवात”