मी काय राज कुंद्रा आहे का?; राज ठाकरेंचा खोचक सवाल

0
345

पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं जोरदार तयारी केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यासाठीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा पुण्याच्या दौऱ्यावर आले आहेत, यावेळी राज ठाकरे यांनी माध्यमांच्या कॅमेरामनला केलेल्या एका प्रश्नाची जोरदार चर्चा होतेय.

राज ठाकरे पुण्यातील मनसे कार्यालयात पोहोचले. त्यावेळी माध्यमांच्या कॅमेरामननी त्यांचे फोटो काढायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी मी काय कुंद्रा आहे का? असा सवाल या कॅमेरामनना केला. राज ठाकरे यांच्या या प्रश्नामुळे उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.

दरम्यान, राज ठाकरे मनसे कार्यालयात दाखल झाले. त्यावेळी माध्यमांच्या कॅमेरामननी त्यांचे फोटो काढण्यास सुरुवात केली. त्यावेळी सगळं झालं? कान, नाक, घसा… केस? किती वेळा तेच तेच घेता रे. मी काय कुंद्रा आहे का? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. त्यांच्या या प्रश्नावर उपस्थित माध्यम प्रतिनिधी आणि कॅमेरामनमध्ये चांगलाच हशा पिकला. स्वत: राज ठाकरेही यावेळी मिश्किल हसले.

महत्वाच्या घडामोडी –

‘माझी प्रकृती उत्तम, काळजीचं कारण नाही’; जयंत पाटलांनी दिली माहिती

पुरग्रस्तांचे हाल बघून उर्मिला मातोंडकरांना झाले अश्रू अनावर; केली ‘ही’ मदत

BREAKING NEWS! जयंत पाटील ब्रीच कँडी रूग्णालयात; अस्वस्थ वाटू लागल्याने मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडली

“शरद पवारांना बाहेरचे सोडा, घरचे लोक देखील गांभीर्याने घेत नसतील”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here