मुंबई : महाराष्ट्रातले सगळे नेते राजकारण बाजूला ठेवून एकवटले. त्यामुळे माझा आत्मविश्वास आणखी दुणावला असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. एक वेगळी एकजूट काल पाहायला मिळाली, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
काल एक चांगली गोष्ट झाली, महाराष्ट्राच्या सर्वपक्षीय बैठक झाली. सगळ्यांना काय करतो आहोत त्याची कल्पना दिली गेली. त्यांच्याकडून सूचना घेण्यात आल्या. मला एका गोष्टीबद्दल समाधान आहे की सगळ्यांनी खूप चांगल्या सूचना दिल्या. काल जी बैठक झाली ते एकजुटीचं वेगळं दर्शन होतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून महाराष्ट्राशी संवाद साधला. औरंगाबादमध्ये रेल्वेने मजुरांना चिरडलेली घटना अत्यंत वेदनादायी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
शिवरायांच्या महाराष्ट्रात लष्कराची गरज नाही- उद्धव ठाकरे
“करोनाचं संकट गंभीर असलं तरीही सरकार खंबीर आहे”
औरंगाबादचं मृत्यूतांडव सुन्न करणारं…; मनसेनं वाहिली श्रद्धांजली
एकनाथ खडसे आणि पंकजा ताई यांच्याबद्दल केंद्राने काही विचार केला असेल- चंद्रकांत पाटील