हाथरस घटनेतील चारही आरोपींना फासावर लटकवायला हवं- रामदास आठवले

0
4

मुंबई : उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर देशभरातून टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते एएनआयशी बोलत होते.

मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची लखनऊमध्ये भेट घेणार आहे. त्यांच्यासोबत हाथरस घटनेवर चर्चा करणार आहे. चारही आरोपींना फासावर लटकवायला हवं, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

दरम्यान, तसेच हाथरस सामूहिक अत्याचारातील पीडितेच्या कुटुंबीयांचीदेखील रामदास आठवले भेट घेणार आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

“सनरायजर्स हैदराबादचा चेन्नई सुपर किंग्जवर रोमहर्षक विजय”

महाराष्ट्रात जरा काय घडलं की राष्ट्रपती राजवटीची मागणी करणारे कुठे आहेत?- अमोल कोल्हे

भाजप म्हणजे नवी ईस्ट इंडिया कंपनीच; अशोक चव्हाण यांची भाजपवर टीका

दोषींना ‘अशी’ शिक्षा केली जाईल की…; हाथरस प्रकरणावर योगी आदित्यनाथांनी सोडलं मौन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here