पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर भरदिवसा गोळीबार झाला आहे. दुपारी दीडच्या सुमारास घडली घटना आहे. या घटनेत कोणालाही जखम झालेली नाही. पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत.
चिंचवड स्टेशनजवळ आमदार अण्णा बनसोडे यांचं कार्यालय आहे. त्याच परिसरात एका व्यक्तीने आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला, असं पोलिसांनी सांगितलं.
अण्णा बनसोडे यांनी अँथनी नावाच्या ठेकेदाराला वार्डातील 2 मुलांना कामाला लावं म्हणून सांगितलं होतं. त्यावेळी तो अरेरावी पद्धतीनं बोलला. सकाळी तो आला त्याच्यासोबत त्याचा मेव्हणा होता. त्या व्यक्तीनं गोळीबार केला. मात्र, या प्रकरणामागे नेमकं काय आहे हे पोलिसांनी तपास केल्यानंतर समोर येईल, असं अण्णा बनसोडे म्हणाले.
दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केल्याची माहिती आहे. आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर ठेकेदारीच्या वादातून गोळीबार झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
महत्वाच्या घडामोडी –
राज्य सरकारच्य लसीकरण मोहीमेवरुन अतुल भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना टोला; म्हणाले…
मराठा मंत्र्यांना आरक्षणात रस नाही, त्यांना मंत्रीपद टिकवायच आहे- नारायण राणे
“निवडणुका संपल्या की पेट्रोल-डिझेलचे दर वाढतात, हेच का तुमचे वित्तनियोजन?”
“युतीत असताना एक बोलणारे शिवसेना पक्षप्रमुख आघाडीत गेल्यावर कसे बदलले, हे आता जनतेला माहीत झालं”