मुंबई : केंद्र सरकारने आयुर्वेदाचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अॅलोपॅथिक शस्त्रक्रियांची परवानगी दिल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने उद्या 11 डिसेंबर रोजी राष्ट्रव्यापी बंद पुकारला आहे. यावेळी त्यांनी उद्या दिवसभर सर्व दवाखाने बंद राहणार असल्याचं जाहीर केलं असून डॉक्टरांनीही दवाखाने बंद ठेवण्याचं आवाहन आयएमएने केलं आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनने एक पत्रक काढून उद्या 11 डिसेंबर रोजी बंद पुकारण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे उद्या सर्व दवाखाने, क्लिनिक्स, ओपीडीच्या सेवा पहाटे 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. आयसीयू, अपघात विभाग आणि प्रसूतीसेवाही सुरू ठेवण्यात येणार असल्याचं आयएमएने स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, असं असलं तरी आरोग्य यंत्रणेतील काही गोष्टी सुरळीत असणार आहे. त्यात अत्यावश्यक आरोग्य सेवा, अतिदक्षता कक्ष, कोविड केअर सेंटर, सीसीयू, अत्यावश्यक शस्रक्रिया सुरु राहणार आहेत., असंही आयएमएनं स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“रावसाहेब दानवेंना घरात घुसून चोपलं पाहिजे”
“रावसाहेब दानवेंचं वक्तव्य तथ्यहीन; शेतकरी आंदोलन करत असताना त्यांनी असं बोलायला नको होतं”
माझा हक्काचा संगीतकार गेला, अरारारा खतरनाकऽऽऽऽऽ आता पुन्हा होणे नाही- प्रविण तरडे
तृप्ती देसाईंना पोलिसांनी घेतलं ताब्यात; शिर्डीत फटाके फोडून जल्लोष