आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : पुण्यात आज सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचं भूमीपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी देशभरात सुरु असलेल्या विविध विकासकामांची यादीच वाचून दाखवली.
आता मी मुंबई-दिल्ली हायवे बांधतोय. 170 किमी स्पीडने गाडी चालवली, पोटातलं पाणी हललं नाही. 70 टक्के काम पूर्ण झालंय, महाराष्ट्रातील काम राहिलं आहे, जेएनपीटीपर्यंत हा रस्ता नेणार आहे., असं गडकरी म्हणाले.
अजितदादा आपण मागणी केली, वसई -विरारपासून वरळीपर्यंत हा रस्ता जोडला तर नरीमन पॉईंटवरुन दिल्लीला 12 तासात पोहोचता येईल. माझं वरळी- बांद्रा सी लिंकशी इमोशनल नातं, माझ्या खात्याकडे खूप पैसे आहेत, दिल्लीला नरीमन पॉईंटशी जोडून देण्याचं काम मी नक्की करेन, तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलून प्रस्ताव तयार करा, असं आवाहन नितीन गडकरी यांनी केलं.
दरम्यान, मुंबईतील वरळी- बांद्रा सी लिंकशी इमोशनल नातं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्त्वात या पुलाची जबाबदारी मला मिळाली.सी लिंक वसई -विरारपर्यंत न्यायचा माझी इच्छा होती. पण महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीमुळे झालं नाही, असंही नितीन गडकरी यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
“…याबद्दल राज्यपाल महोदयांचे आभार मानायला हरकत नाही”
“भाजपला 3 वर्षात देशातून हाकलून लावायचं माझं लक्ष्य आहे”
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला घरचा आहेर; लाचखोरांना पाठीशी घातलं जात असल्याचा ‘या’ नगरसेविकेचा आरोप!