मुंबई : पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल लागून आता आठवडा लोटला आहे. मात्र, राज्याच्या राजकारणात त्यावरची चर्चा थांबायला तयार नाहीत. पंढरपूर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव करत भाजपाचे उमेदवा समाधान अवताडे यांनी विजय मिळवला आहे. या मुद्द्यावरून गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची निवडणुकीपूर्वी 15 ते 20 दिवस अशी वक्तव्य होती की आम्ही 50 ते 80 हजार मतांच्या फरकाने निवडून येणार आहोत. अजितदादांचं वक्तव्य होतं की 4 पक्षांपैकी 3 पक्ष आम्ही एकत्र आहोत. असा कोणता माईचा लाल आहे जो निवडून येईल? तो माईचा लाल समाधान अवताडेंच्या रुपाने महाराष्ट्राला मिळाला आहे, असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना हे आविर्भावात वागत होते की आम्ही तिघं एकत्र आहोत, त्यामुळे जे आम्ही म्हणू तेच होईल. विश्वासघातानं सत्तेत येता येतं, पण लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यात ते अपयशी ठरले आहेत”, असं म्हणत पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
नुसता विरोधाला विरोध करणं चुकीचं आहे- जयंत पाटील
“राज्य सरकारने स्वतःची पाठ थोपटत बसण्यापेक्षा आरोग्य यंत्रणेत सुधारणा करण्याची आवश्यकता”
“विरोधकांनी केवळ टीका न करता लसीसाठी एखादं पत्र केंद्रालाही लिहावं”
आदित्य ठाकरेंना जसं मंत्रीपद दिलंत, तसंच बहुजनांचं पालकत्व स्वीकारा; पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र