पुणे अपघातावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘कितीही श्रीमंताच्या बापाचा..’

0
5

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : पुणे हिट अँड रन प्रकरणावर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार आज पुण्यात टायटन घड्याळच्या शोरुमच्या उद्घाटनाला आले होते. यावेळी अजित पवारांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

पुण्याच्या हिट अँड रन प्रकरणाकडे आपलं बारकाईने लक्ष आहे. घटना समजल्यापासून पहिल्या दिवसापासून या घटनेकडे आपलं लक्ष आहे. तसेच या प्रकरणावर आपण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा देखील केल्याची माहिती अजित पवारांनी दिली.

ही बातमी पण वाचा : ‘…तर भाजप सत्तेतून बाजूला जाईल’- जयंत पाटील

कुणावरही आकस बुद्धीने काही कारवाई होणार नाही. पण जे कुणी दोषी असतील ते किती मोठे असले, कितीही श्रीमंत असले, कितीही श्रीमंताच्या बापाचा पोरगा असला तरी रितसर जी काही कारवाई असेल ती केली जाईल. कायदा हा श्रीमंताला, गरिबाला आणि मध्यमवर्गीयालादेखील सारखा आहे. नियम सगळ्यांना सारखे आहेत. त्याचप्रमाणे कारवाई चाललेली आहे, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

मोठी बातमी! गजानन कीर्तिकर यांच्या हकालपट्टीची मागणीला भाजपचा पाठिंबा!

“…अन् राज ठाकरे माध्यमांवर भडकले; नेमकं कारण काय, वाचा सविस्तर”

“प्रफुल्ल पटेल 2004 पासूनच भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही होते”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here