आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एका भीषण विमान अपघातात निधन झाले. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर शोकाकुळ पसरली आहे.दरम्यान या धक्कादायक घटनेनंतर सोशल मीडियावर अजित पवार यांचं शेवटचं ट्वीट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
दुर्घटनेच्या काही वेळ आधी अजित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर केली होती. सकाळी 8 वाजून 57 मिनिटांनी त्यांनी ही पोस्ट शेअर केली होती.
महान स्वातंत्र्यसैनिक आणि ‘पंजाब केसरी’ म्हणून ओळखले जाणारे लाला लजपत राय यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले होते. “राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे, महान स्वातंत्र्य सेनानी, स्वराज्याचे उद्घोषक ‘पंजाब केसरी’ लाला लजपत राय जी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! त्यांची राष्ट्रनिष्ठा सदैव प्रेरणा देत राहील,” असा मजकूर त्यांच्या पोस्टमध्ये होता.
महत्त्वाच्या बातम्या –
विमान अपघातात अजित दादांचं निधन; नेमकं काय घडलं जाणून घ्या?
CJI सूर्यकांत यांच्या सत्कारावर संजय राऊतांची बोचरी टीका…!
नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेने पहिला भगवा फडकवला

