महाविकास आघाडी यांचं सरकार पाच वर्षे टिकणार- अजित पवार

0
187

मुंबई | शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष आणि त्यांनी स्थापन केलेली महाविकास आघाडी यांचं सरकार पाच वर्षे टिकणार यात माझ्या मनात मुळीच शंका नाही. तुम्ही म्हणत असाल तर स्टँपपेपरवरही लिहून देतो,  असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे.

अजित पवार सकाळपासून नॉट रिचेबल होते. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत, मात्र अजित पवार यांनी मध्यमांशी संवाद साधत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

भाजपबाबत मला खोदून खोदून विचारू नका. तसचं मी आज शपथ घेणार नाही. मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे शपथ घेतील, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. असं अजित पवारांनी ठणकावून सांगितलं आहे.

दरम्यान, मी बंड केलेलं नाही. मी भाजपसोबत का गेलो होतो त्याबद्दल मी योग्य वेळ आल्यावर बोलेन. आज मी त्याबद्दल काही बोलणार नाही, असंही ते म्हणाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here