आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासोबत 2019 साली 72 तासांच सरकार स्थापन केलं होतं. यावेळी झालेल्या शपथविधीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे.
अजित पवारांसोबत झालेला शपथविधी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांशी चर्चा करूनच झाला होता, असा गाैफ्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केला होता. यावरून आता खुद्द अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : “पवारांना विचारुन सरकार स्थापन केलं असतं तर..”; काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य
देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या गाैफ्यस्फोटावर बोलण्यास अजित पवारांनी नकार दिला. मला बाकीच्यांबद्दल काहीही बोलायचं नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलेल्या शपथविधीबद्दल मला काहीही बोलायचं नाही. विषय संपला. दुसरे काही विषय असतील तर बोला. मी याआधी यावर बोललेलो आहे. त्यामुळे मी माझ्या त्याच मतावर ठाम राहणार आहे. तुम्ही पुन्हा पुन्हा विचारण्याचा प्रयत्न केला तरी माझ्याकडून हेच उत्तर मिळणार, असंही अजित पवारांनी यावेळी स्पष्ट सांगितलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
शरद पवारांविषयी बोलताना, आमदार गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली, म्हणाले…
“सर्वात मोठी बातमी! कसबा-चिंचवड पोटनिवडणूकीत मनसेचा भाजपला पाठिंबा”
“लगान चित्रपटातील ‘हा’ अभिनेता काळाच्या पडद्याआड”