पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी अजित पवारांच मोठं वक्तव्य; म्हणाले…

0
502

मुंबई : पुण्यात शिक्षण घेत असलेल्या 22 वर्षीय तरुणीने रविवारी पुण्यातील महम्मदवाडी परिसरातील हेवन पार्क सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती, त्या आत्महत्येस महाविकास आघाडी सरकारमधील विदर्भातील एका मंत्र्याचा समावेश असल्याची चर्चा सुरू आहे. यावर भाजप नेत्यांनी टीका केली होती. त्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी चौकशी होऊ द्या, चौकशीनंतर काय ते समोर येईल, असं म्हणत अजित पवारांनी  भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी ते बोलत होते

एखाद्या नेत्याला राजकीय उंची गाठण्यासाठी बराच काळ-वेळ घालवावा लागतो, कष्ट घ्यावे लागतात, परिश्रम करावे लागतात. परंतु आरोप करणारा कशाही पद्धतीने आरोप करू शकतो, असा टोलाही अजित पवारांनी यावेळी लगावलाय.

दरम्यान, चौकशी पूर्ण होण्याच्या आधी काही लोक आरोप करतात. त्याला काही अर्थ नाही, असंही अजित पवार म्हणालेत.

महत्वाच्या घडामोडी 

साताऱ्यात कॉलेज तरुणींची तुफान हाणामारी; व्हिडीओ होतोय व्हायरल

मुख्यमंत्री महोदय, एवढे पुरावे असतांना वाट कसली पाहताय?; चित्रा वाघ यांचा सवाल

…यापुढे काँग्रेसच महाराष्ट्रात सत्तेत राहणार; नाना पटोलेंचं मोठं विधान

16 फेब्रुवारीपासून पेंग्विन पहायला याचचं हं! पण खबरदार जर…; आशिष शेलारांचा सरकारवर हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here