आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार काल थोडक्यात बचावले आहेत. स्वत: अजित पवारांनी त्यांच्यासोबत घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली.
काल 14 तारीख होती. काल कुठं बोललो नव्हतो. तुम्ही आता घरचे आहात म्हणून बोलतो. काल मी सकाळी एका हॉस्पिटलचं उद्घाटन केलं. चौथ्या मजल्यावरून लिफ्ट घेऊन जात होतो. तिसऱ्या मजल्यावरून चौथ्या मजल्यावर जात होतो. सोबत डॉ. हार्डिकर होते. त्यांच 90 वर्षे वय आहे. सोबत सेक्युरिटी ऑफिसर होते. लिफ्टमध्ये बसलो. लिफ्ट वर जाईना. तिथचं बंद झाली. नंतर लाईट गेली. अंधार होता. नंतर ती लिफ्ट चौथ्या मजल्यावरून धाडदिशी खाली आहे. खोट सांगत नाही. आज श्रद्धांजलीचाच कार्यक्रम झाला असता, असं अजित पवार म्हणाले.
हे ही वाचा : “सत्यजित तांबेंच्या अडचणी वाढणार; ठाकरेंकडून ‘या’ मोठ्या नेत्याला पाठिंबा”
‘यानंतर दरवाजा तोडण्यात आला, पण मला भीती हर्डीकर डॉक्टरांची होती. याबाबत मी पत्नी आणि आईलाही बोललो नाही. मी पत्रकारांनाही सांगितलं नाही, नाहीतर कालच ब्रेकिंग न्यूज सुरू झाली असती. याबाबत कुणालाही बोलून नका, हे मी यांना सांगितलं होतं, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी यावेळी दिली.
महत्त्वाच्या घडामोडी –
“सत्यजित तांबेंच्या अडचणी वाढणार; ठाकरेंकडून ‘या’ मोठ्या नेत्याला पाठिंबा”
बहीण- भाऊ पुन्हा एकत्र; पंकजा मुंडे पोहचल्या ब्रीच कँडी रूग्णालयात, भाऊ धनंजय मुंडेंना म्हणाल्या…