‘ते’ मुख्यमंत्र्याचे काैतुक आहे की अब्रू काढणे हे फक्त अजित पवारच सांगू शकतात- अतुल भातखळकर

0
435

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुक्तकंठाने तारीफ केली. कोरोनाच्या संकटकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा इतका अभ्यास केला की ते आता जवळपास अर्धे डॉक्टरच झाले आहेत. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना कोविडची लागण झाली पण कोरोना त्यांच्यापाशी फिरकलाच नाही,असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनी कोरोनाचा इतका अभ्यास केला की ते आता अर्धे डॉक्टरच झाले आहेत. त्यांच्यापाशी कोरोना फिरकलाच नाही: अजित पवार… हे मुख्यमंत्र्याचे काैतुक आहे की अब्रू काढणे आहे हे फक्त अजित पवारच सांगू शकतात. त्यांनी संजय राऊत यांच्याकडून धडे घेतलेले दिसतायत., असं म्हणत भातखळकरांनी राऊतांवरही निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

भाजपने आता तरी जनतेला गृहीत धरणे सोडावे- विजय वडेट्टीवार

चंद्रकांतदादांनी माझा विजय सोपा केला- अरुण लाड

पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे अरुण लाड विजयी; भाजपचा पराभव

अवघ्या 2 दिवसांचं अधिवेशन घेणं म्हणजे चर्चेपासून पळ काढण्याचा प्रयत्न- देवेंद्र फडणवीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here