अजित पवार थोड्या दिवसांनी शिवसेनाही चालवतील- मनसेचा शिवसेनवर पलटवार

0
530

मुंबई : मुंबईत बेकायदेशीररित्या राहणाऱ्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात आज मनसेनं मोर्चा काढला.  मनसेचा हा मोर्चा भाजप पुरस्कृत असल्याचा आरोप शिवसेनेने केला. त्यानंतर आता मनसेने शिवसेनेला प्रत्युत्तर दिलं आहे.

अजित पवार हे सरकार चालवत असून थोड्या दिवसांनी शिवसेनाही चालवतील, असं म्हणत मनसे नेते अविनाश जाधव यांनी  शिवसेनेवर टीका केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा गळा घोटला आहे. सध्या शिवसेना नाही, तर अजित पवार सरकार चालवत आहेत. थोड्या दिवसांनी शिवसेना देखील ते चालवतील, राज्य सरकार अजित पवार पुरस्कृत आहे, असं अविनाश जाधव म्हणाले.

दरम्यान, बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसदार राज ठाकरे आहेत, असंही अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“असा फुकटचा धंदा राज्य सरकारने करू नये”

 त्यामुळे माझ्यावर कमळ बघण्याचे संस्कार नाहीत- शरद पवार

…म्हणून मी दिल्लीत जाणार नाही- देवेंद्र फडणवीस

आपल्यातील भांडण विसरा आणि बाळासाहेबांचं खरं स्वप्नं जामिनीवर येऊन पूर्ण करा- अमृता ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here