अजित पवार भाजप मध्ये जाण्याचं ‘हे’ होतं कारण.. शरद पवारांनी केला खुलासा

0
170

मुंबई : दिल्लीतील नेहरू सेंटरमधील बैठकीत माझे काँग्रेसपक्षातील काही नेत्यांशी तीव्र मतभेद झाले होते. त्यामुळे अजित पवार यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

जर आताच हे काँग्रेस अशा प्रकारची टोकाची भूमिका घ्यायला लागले तर, उद्या सरकार तरी कसं चालणार? असा आक्षेप घेत अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, असं शरद पवार म्हणाले.

काँग्रेससोबत वाद झाल्यानंतर मी तेथून निघून गेलो. त्यावर अजित पवार यांनी आमच्या सहकाऱ्यांजवळ काँग्रेसबद्दलची नाराजी व्यक्त केली होती. तेव्हापासून ते अस्वस्थ होते. त्यानंतर अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आणि निर्णय घेतला, असंही शरद पवार यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, अजित पवारांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आम्ही सर्व कुटुंबीय नाराज झालो होते, असंही त्यांनी सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here