राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक; अजित पवार मुर्दाबाद.. अशा दिल्या घोषणा

0
205

मुंबई : कर्नाटक नंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तर उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांनी शपथ घेतली आहे. यावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

सोलापूरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार मुर्दाबाद.. अशा घोषणा दिल्या आणि अजित पावार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहनही केलं आहे.

एकच साहेब पवारसाहेब… पवार साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं… अश्या घोषणाही दिल्या. तर दुसरीकडे बारामतीत काहीश्या संमिश्र प्रतिक्रिया पहायला मिळाल्या.

अजित दादांज्या निर्णयाला आमचा पाठिंबा असेल, असं काही लोक म्हणत आहेत. तर आम्ही 80 वर्षाच्या योद्ध्यासोबत आहोत., असे फ्लेक्स लागले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here