जयंत पाटील यांची विधीमंडळ नेतेपदी नियुक्ती.. तर अजित पवारांची हकलपट्टी

0
198

मुंबई : महाराष्ट्राला नव्हे तर देशाला धक्का देणारी घटना एका रात्रीत घडली आहे. आज सकाळी अनपेक्षितपणे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर आता अजित पवारांची विधीमंडळ गटनेतेपदावरुन हकलपट्टी करण्यात आली आहे.

अजित पवार यांच्य जागी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची विधीमंडळ नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. यामध्ये पक्षाचे निर्णय घेण्याचे सर्व अधिकार राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना देण्याचा ठरावही या बैठकीत घेण्यात आला.

दरम्यान, राष्ट्रवादीने अजित पवारांची 30 ऑक्टोबर 2019 रोजी विधीमंडळ पक्षनेते पदी निवड करण्यात आली होती. मात्र त्यांनी भाजपसोबत जाण्याची भूमिका घेतल्यामुळे त्यांना विधीमंडळ गटनेतेपदावरुन काढण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here