कोल्हापूर : ठाकरे सरकार झोपेत असतानाच पडेल, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत चंद्रकांत पाटलांना टोला लगावला होता.
ज्या दिवसापासून महाविकास आघाडी सरकार आलं, तेव्हापासून भाजप नेत्यांना असह्य झालंय. त्यांना आपण सरकारमध्ये नाही हे सतत बोचत असतं. कार्यकर्त्यांनी सोबत रहावं यासाठी काही ना काही बोलत राहतात. जोपर्यंत तिन्ही पक्षाचे नेते निर्णय घेत नाहीत तोपर्यंत सरकार राहणार, असं अजित पवार म्हणाले होते. यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देत अजित पवारांवर निशाणा साधला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर टीका करताना तोंड सांभाळून बोलावे. नाहीतर आम्ही फाटक्या तोंडाचे आहोत. आम्ही बोलायला लागलो तर तुम्हाला महागात पडेल, असा इशारा चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांना दिला. ते कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, अजित पवारांना तलवारीचा धाक दाखवून कोणी शपथविधीसाठी नेले नव्हते. त्यामुळे आपण ज्या भाजपसोबत 3 दिवसांचे सरकार स्थापन केले होते आणि ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलो होतो, त्यांच्याविषयी काय बोलतोय, याचे भान अजित पवारांनी बाळगावे. तसेच तुम्हाला राष्ट्रवादीचे 28 आमदार तुमच्यासोबत ठेवता आले नाहीत. ते शरद पवारांकडे पुन्हा पळून गेले. हा अजित पवार यांचा दोष आहे, असा टोला चंद्रकांत पाटलांनी यावेळी लगावला.
महत्वाच्या घडामोडी –
राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजावर पुन्हा अन्याय झाला- देवेंद्र फडणवीस
“आमदार लंके यांचं काम देशासाठीही आदर्शवत”
“आम्ही अजून हिंदुत्व सोडलं नाही, असं तरी आता कोडगेपणाने सांगू नका”
“ठाकरे सरकारने दारूचा प्यालाच उचललाय, दारू-बार याच मुद्द्यावर सरकार झटपट निर्णय घेते”