अजित पवार दाखवतात तिखट, पण कामात एकदम पोकळ माणुस; निलेश राणेंचा टोला

0
417

मुंबई : भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

सत्ता आल्यावर तीन महिन्यात 7-12 कोरा नाही केला तर पवारांची औलाद सांगणार नाही, असं अजित पवारांनी 2019 मध्ये म्हटलं होतं. तसेच 31 जुलै 2021 पर्यंतच्या MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार, अशी घोषणा काल अजित पवारांनी केली होती. यावर निलेश राणे यांनी ट्विट करत अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे.

अजित पवार दाखवतात तिखट पण कामात एकदम पोकळ माणुस. एक काम सांगितलेलं पूर्ण नाही पण काही झालं तरी पवारांची औलाद सांगणार नाही हे शंभर वेळा महाराष्ट्राने ऐकले. बोलत राहायचं आणि करायचं काहीच नाही हे पवार कुटुंबचं करू शकतं म्हणून अजित पवार साहेब तुम्ही पवारचं आहात हे सिद्ध झालं आहे., असं म्हणत निलेश राणेंनी अजित पवारांना टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

लक्षात ठेवा….हर एक का दिन आता है…हिसाब बराबर होगा; चित्रा वाघ कडाडल्या

शिवसेना-भाजपचं नातं आमिर खान आणि किरण राव यांच्यासारखं- संजय राऊत

शरद पवारांना असा मुख्यमंत्री कसा चालतो?; नारायण राणेंचा सवाल

“विधानसभेत जोरदार राडा; भाजपच्या 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here