आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
‘अलिकडे अनेक गोष्टी घडत आहेत. सन्मानीय व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्ये केली जात आहेत. ही वक्तव्ये महाराष्ट्राला मान्य होणारी नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थान केलं. ज्योतिबा फुलेंनी शिक्षणाचा पाया रचला. या महामानवांच्या विचारांचा वारसा आपल्याला पुढे न्यायाचा आहे. माझ्या मनात कुणाबद्दलही आकस नाही, हे ही नम्रपणे नमूद करतो, असं म्हणत अजित पवारांनी राज्यपालांना अप्रत्यक्ष टोला लगावला.
हे ही वाचा : मला मनसेच्या प्रत्येक कार्यालयात शिवरायांच्या ‘त्या’ 2 ओळी फ्रेम करून ठेवायच्या आहेत- राज ठाकरे
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे मेट्रोचं उद्घाटन करण्यात आलं. इतकंच नव्हे तर पंतप्रधान मोदींनी मोबाईलद्वारे तिकीट काढत पुणे मेट्रोतून प्रवासही केला. त्यानंतर एमआयटी महाविद्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
…त्यामुळे राज्यपालांना टार्गेट करणं अतिशय अयोग्य आहे; देवेंद्र फडणवीसांकडून राज्यपालांची पाठराखण
शरद पवार म्हणाले राणेंनाही अटक झाली होती; आता नारायण राणे म्हणतात…
यंदा बाकीच्या पक्षांना हाणायचं म्हणजे, हाणायचं; ‘राज’गर्जना बरसली