अजित पवार फुटून जातील असं कधीही वाटलं नव्हतं- शरद पवार

0
175

मुंबई : अजित पवार फुटून जातील असं कधीही वाटलं नव्हतं. फाटाफुटीचं हे राजकारण मी खूप पाहिलंय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून सरकार स्थापनेचा भाजपचा प्रयत्न यशस्वी होणार नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.

अजित पवार हे आज सकाळी सकाळी राजभवनात गेले आहेत, असं मला सहा वाजता कळलं. महाराष्ट्राच्या राजभवनाची कार्यक्षमता अचानक इतकी वाढल्याबद्दल मला आनंद झाला. मात्र, नंतर सगळ्या घडामोडींचा उलगडा झाला. ते असं काही करतील हे मलाही वाटलं नव्हतं, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

भाजपाला बहुमत सिद्ध करता येणार नाही. त्यानंतर आम्ही सरकार स्थापन करु असंही पवार यांनी म्हटलं आहे. आम्ही एकत्र होतो, आहोत आणि राहू असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, 30 नोव्हेंबरला पुढचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस हे तिन्ही पक्ष पुन्हा एकदा सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करतील, असंही शरद पवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here