अजित पवार माघारी येऊ शकतात- संजय राऊत

0
168

मुंबई :  भाजपला समर्थन दिलेले राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार माघारी येऊ शकतात, असं मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

अजित पवार यांना ब्लॅकमेल करण्यात आलं आहे. ते का गेले? त्यांना कुणीची फूस होती? हे उद्या सगळं सामनाच्या अग्रलेखात मी स्पष्ट करणार आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

दुसरीकडे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी अजित पवार त्यांच्या निर्णयावर फेरविचार करतील, असं म्हटलं आहे.

राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीम हे अजित पवारांच्या मनधरनीसाठी त्यांच्या भेटीला पोहचले आहेत. अजित पवार हे त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here