अर्थसंकल्पात महाराष्ट्राला मिळालेल्या कर निधीवर अजित पवार नाराज, म्हणतात…

0
611

मुंबई : 2019-20च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला मिळालेल्या कर निधीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर आपली नाराजी व्यक्त केली आहे.

आर्थिक वर्ष 2019-20 च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार महाराष्ट्राला केंद्रीय करातील 44 हजार 672 कोटींचा निधी मिळणं अपेक्षित होतं. परंतु सुधारीत अंदाजानुसार केंद्रीय करातील 8 हजार 553 कोटी रु. कमी होऊन 36 हजार 220 कोटी रुपयांचीच तरतूद करणं हे राज्यासाठी अतिशय धक्कादायक आहे, असं ट्वीट करत

 देशाच्या तिजोरीत महाराष्ट्र राज्य सर्वाधिक कर भरतो. देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचं योगदान सर्वात जास्त आहे. मात्र तरीही केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्र गायब असल्याची खंत अजित पवारांनी व्यक्त केली आहे.

केंद्राच्या अर्थसंकल्पात मुंबई, पुणे, नागपूरच्या परिवहन सेवेचा उल्लेखही होत नाही. पण गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये आंतरराष्ट्रीय सोने-चांदी बाजाराची घोषणा होते. बहुतेक हे सर्व राज्याच्या राजधानीचं महत्व कमी करण्यासाठी तर नाही ना?, असा सवालही अजित पवारांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी-

‘या’ कारणासाठी मी कोणत्याही थराला जायाचं ठरवलं होतं- उद्धव ठाकरे

“विरोधकांना गाडण्यात आमची पी. एचडी आहे, म्हणूनच मी दिल्लीच्या प्रचाराला आले”

आरोग्य क्षेत्रासाठी 69 हजार कोटींची तरतुद- निर्मला सितारमण

पुन्हा सुपरओव्हर पुन्हा भारताचा विजय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here