“अजित पवार हे कोणत्या राष्ट्रवादीमध्ये आहेत हे पाहावं लागेल”

0
185

मुंबई : महाराष्ट्राला धक्का देणारी घटना काल एका रात्रीत घडली.  सकाळी अनपेक्षितपणे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनीही अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

अजित पवार हे कुठल्या पक्षात आहेत हे मला माहित नाही. काल शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने त्यांची गटनेतेपदावरुन हकालपट्टी केली आहे.

आम्ही शरद पवार यांच्यासोबत आहोत आणि कायम बरोबर राहणार. अजित पवार कोणत्या राष्ट्रवादीमध्ये आहेत हे पाहावं लागेल

दरम्यान, अजित पवारांच्या बंडामुळे महाराष्ट्रातील राजकारणात मोठा भूंकप झाला. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीत फूट फडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here