मुंबई : महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून भाजपचे अनेक आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता. यावर भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीतील कोणताही नेता सांगत असला तरी भाजपचा एकही आमदार फुटणार नाही, असं म्हणत पडळकरांनी अजित पवारांच्या वक्त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा विश्वास गमावला आहे. तो परत मिळवण्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपलं स्थान मजबूत करण्यासाठी अजित पवार यांचे प्रयत्न सुरु आहे, असा टोलाही यावेळी पडळकरांनी लगावला आहे.
दरम्यान, अजित पवार हे दिवसाला बदलत राहणारे नेते आहेत. भाजपचं सरकार होतं तेव्हा एखादी जरी नोटीस आली तरी ते टीव्हीसमोर रडत होते. आता मात्र एखादा टग्या असल्याचा आव आणत भाषणं देत सुटले आहेत., असं म्हणत पडळकरांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
शपथविधीनंतर स्वतःचे आमदार टिकवता आले नाही तो माणूस…; निलेश राणेंचा अजित पवारांवर हल्लाबोल
जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकवायला हवा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा असा उल्लेख करू शकलो असतो पण…; पडळकरांचं राऊतांना पत्र
“भाजप नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात गुन्हा दाखल”