आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे 2 जुलै रोजी 40 आमदारांना घेऊन शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांच्यासह 8 आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे.
अजित पवारांच्या या बंडानंतर राष्ट्रवादीत 2 गट पडले आहेत. एक अजित पवारांचा, तर दुसरा शरद पवारांचा. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षचिन्हावर अजित पवार गटाकडून दावा केला आहे. यानंतर आता अजित पवार गट आणि शरद पवार गटामध्ये कायदेशीर लढाईला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाने अजित पवार गटातील 12 आमदारांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. अशातच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत मोठं विधान केलं आहे.
ही बातमी पण वाचा : कृषीमंत्रीपद गेल्यानंतर मंत्री अब्दुल सत्तार यांची पहिली प्रत्रिक्रिया; म्हणाले…
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आज किंवा उद्या अजित पवार गटातील आमदार नक्की अपात्र ठरतील, असं विधानतेंद्र आव्हाड यांनी यावेळी केलं. ते टी.व्ही. 9 मराठीशी बोलत होते.
दरम्यान, 12 आमदारांना पाठवलेल्या नोटीसीबद्दल विचारलं असता, “सर्वोच्च न्यायालयाचा जो आदेश आला आहे. त्यावरून हे स्पष्ट झालं आहे की, संबंधित आमदार आज नाहीतर उद्या अपात्र ठरणारच आहेत. आता प्रक्रिया सुरू झाली आहे. तिच प्रक्रिया आम्हालाही लागू होईल. त्यामुळे मला वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे मी नोटीस पाठवली आहे., असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
अजित पवारांकडे अर्थखातं दिल्यावर, एकनाथ खडसेंचा शिंदे गटाला टोला, म्हणाले…
“बंडानंतर पहिल्यांदाच अजित पवार, शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल, चर्चांना उधाण”
अखेर वाटप जाहीर; मंत्रिमंडळात कुणाला मिळालं कोणतं मंत्रीपद?; वाचा सविस्तर