आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात प्रेक्षकांना मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. नंतर कोर्टाकडून आव्हाड यांची जामीनावर सुटका करण्यात आली. त्यानंतर भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्याने आव्हाडांवर विनयभंगाचा आरोप केला होता. त्यानंतर आव्हाड यांनी आज सकाळी एक खळबळजनक ट्विट केलं.
पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही ,., मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार … मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे,,. लोकशाहीची हत्या .. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत, असं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलं.
हे ही वाचा : “आमच्या शिवरायांना विकू नका, नाहीतर…; सामनाचा रोख कुणाकडे?”
आव्हाड यांनी राजीनाम्याचा ईशारा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आव्हाडांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली, यानंतर संध्याकाळी अजित पवारही जितेंद्र आव्हाड यांना भेटायला गेले. आव्हाडांच्या राजीनाम्याच्या इशाऱ्यावर अजित पवार यांनी स्पष्ट मत मांडलं.
जितेंद्र आव्हाड पवार साहेबांना दैवत मानतात, पवार साहेब शेवटचा निर्णय सांगतील, तोच निर्णय आव्हाड मान्य करतील, त्यांना तो पटो किंवा न पटो. साहेबांचा शब्द म्हणून ते मान्य करतील. हे मी त्यांच्या साक्षीने सांगतो. जितेंद्र आव्हाड यांनी ते ट्वीट मागे घ्यावं,’ असं अजित पवार यांनी आव्हाडांसमोरच म्हणाले. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांच्या राजीनाम्याचा निर्णय शरद पवारच घेतील, असंही अजित पवारांनी यावेळी ठणकावून सांगितलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
…म्हणून मी, माझ्या आमदारकीचा राजीनामा देतोय; जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटने खळबळ
“गजानन किर्तीकरनंतर आता ‘हा’ मोठा नेता उद्धव ठाकरेंची साथ सोडून, शिंदे गटात प्रवेश करणार”
जामीन मिळताच जितेंद्र आव्हाडांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, राज ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी…