100 दिवस 100 कामे संकल्पनेवर भर; ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांचा विशेष महिला जाहीरनामा

0
34

पुणे – महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार प्रचार सुरु आहे. येत्या १५ तारखेला मतदान होणार आहे. त्यामुळे उमेदवार जोरदार प्रचार करत आहेत. पुण्यातील प्रभाग क्रमांक ३ मधील भारतीय जनता पक्षच्या उमेदवार ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांनी महिलांसाठी खास जाहीरनामा सादर करत प्रचारात ठळक वेगळेपण निर्माण केले आहे.

महिला आरोग्य, महिला सुरक्षितता, महिला कौशल्य विकास आणि महिला सक्षमीकरण या चार महत्त्वाच्या मुद्द्यांवर आधारित हा जाहीरनामा असून, विशेषतः लोहगाव आणि वाघोली परिसरातील महिलांच्या दैनंदिन समस्या आणि गरजा लक्षात घेऊन तो तयार करण्यात आला आहे. निवडून आल्यानंतर या चारही विषयांवर प्राधान्याने काम केले जाईल, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

फक्त कागदावर जाहीरनामा जाहीर करून थांबायचे नाही, तर वाघोली आणि लोहगाव परिसरातील प्रत्येक घरापर्यंत जाऊन या योजनांची अंमलबजावणी केली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महिलांच्या आरोग्यासाठी मूलभूत सुविधा, सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना, कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आणि आर्थिक-सामाजिक सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.

प्रचारात भाजपची आघाडी कायम

प्रभाग क्रमांक ३ मध्ये सुरुवातीपासूनच भाजपचा प्रचार प्रभावी ठरत असल्याचे चित्र आहे. उच्चशिक्षित आणि आयटी क्षेत्रातील अनुभव असलेल्या ऐश्वर्या पठारे यांनी आपल्या वेगळ्या विचारसरणीमुळे प्रचारात लक्ष वेधून घेतले आहे. “नगरसेवक म्हणून नव्हे, तर प्रभागाची प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करणार,” अशी भूमिका त्यांनी आधीच मांडली होती.

‘100 दिवस 100 कामे’ संकल्पनेवर भर

प्रचारादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘100 दिवस 100 कामे’ या महत्त्वाकांक्षी संकल्पनेचा प्रभावी वापर केला. निवडून आल्यानंतर पहिल्या 100 दिवसांत 100 ठोस कामे पूर्ण करण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला असून, त्यासाठी कोणत्या कामांना प्राधान्य दिले जाईल याची सविस्तर रूपरेषाही मतदारांसमोर मांडण्यात आली आहे.

पूर्व पुण्यातील महिलांसाठी नवी दिशा

येरवडा, वाघोली, लोहगाव, चंदननगर आणि खराडी हा पूर्व पुण्याचा भाग झपाट्याने विकसित होत आहे. या विकासाच्या प्रवासात महिलांचा सक्रिय सहभाग वाढवणे आणि त्यांना सक्षम करणे, हाच या महिला जाहीरनाम्याचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.

मतदारांचा निर्णय महत्त्वाचा

महिलांवर केंद्रित स्वतंत्र जाहीरनाम्यामुळे प्रभाग क्रमांक ३ मधील निवडणूक अधिकच रंगतदार झाली आहे. सुशिक्षित आणि आधुनिक दृष्टिकोन असलेल्या उमेदवाराच्या पाठीशी मतदार उभे राहतात का, आणि त्यांना पुणे महानगरपालिकाच्या सभागृहात पाठवतात का, हे पाहणे आता निर्णायक ठरणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here