ऐश्वर्या आणि आराध्याची कोरोनावर मात; अभिषेक बच्चनचे ट्विट

0
146

मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चन यांनी कोरोनावर मात केली आहे. ऐश्वर्या आणि मुलगी आराध्या यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याबाबत स्वत: अभिनेते अभिषेक बच्चन यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

आपल्या सर्वांचा आभारी आहे. मी सदैव आपल्या ऋणात राहीन. ऐश्वर्या आणि आराध्या यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता ते घरीच आराम करतील. तर मी आणि माझे वडील सध्या रुग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली आहोत, असं अभिषेक बच्चन यांनी सांगितलं.

दरम्यान, अशा प्रकारे अभिषेक बच्चन यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली.

महत्वाच्या घडामोडी-

रिक्षाचं स्टिअरिंग उद्धव ठाकरेंच्या हातात, पण कुठे जायचं हे मागे बसलेले ठरवतात- देवेंद्र फडणवीस

मातोश्रीवर टीका करणाऱ्यांचा शेवट नारायण राणेंसारखा होतो; शिवसेनेचं चंद्रकांत पाटलांवर टीकास्त्र

ये दोस्ती…. हम नही तोडेंगे…; संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना खास शुभेच्छा!

कालची चंगू-मंगू मुलाखत बघितली; निलेश राणेंची उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here