मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर भाजप नेत्यांनी गृहमंत्री देशमुखांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर काल पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत संतप्त प्रतिक्रिया उमटली. यावरून आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.
कालच्या कॅबिनेट बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले की, “आपण पोलीस अधिकाऱ्यांना ओळखण्यात कमी पडलो, आपल्याला त्यांच्यावर नियंत्रण ठेवता आले नाही !” अहो उद्धव जी… राज्यात तुमचे दीड वर्षातील पराक्रम पाहता तुम्हाला खरंतर अनेक गोष्टींवर खंत वाटण्याची गरज आहे, असं चंद्राकांत पाटील म्हणाले.
राज्यातील शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे यांचं काय वैर आहे देव जाणे?, शेतकरी ठाकरे सरकारच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत आहे. शेतकऱ्यांना आपली व्यथा सरकारच्या दारी मांडून मदतीची याचना करण्याऐवजी त्यांना जीव देणं जास्त सोपे वाटतंय, तुम्हाला याची खंत वाटत नाही का?,असा सवाल करत जयंत पाटलांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
दरम्यान, ट्विट करत चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिकास्त्र सोडलं आहे.
कालच्या कॅबिनेट बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले की, “आपण पोलीस अधिकाऱ्यांना ओळखण्यात कमी पडलो, आपल्याला त्यांच्यावर नियंत्रण ठेवता आले नाही !” अहो उद्धव जी… राज्यात तुमचे दीड वर्षातील पराक्रम पाहता तुम्हाला खरंतर अनेक गोष्टींवर खंत वाटण्याची गरज आहे ! @OfficeofUT pic.twitter.com/TgsuUgw8O0
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) March 25, 2021
महत्वाच्या घडामोडी –
संजय राऊत शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे प्रवक्ते?; प्रवीण दरेकरांचा सवाल
…तर देवेंद्र फडणवीस यांचीही चाैकशी करा- नाना पटोले
खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली सोनिया गांधींची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
“नितेश राणेंचा कणकवलीत पराभव करून शिवसेना काय चीज आहे हे दाखवून देऊ”