Home महाराष्ट्र अहो दादा, असं मोघलांसारखं काय बोलता; अमोल मिटकरींचा घणाघात

अहो दादा, असं मोघलांसारखं काय बोलता; अमोल मिटकरींचा घणाघात

मुंबई : शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात चांगलीच खडाजंगी झालेली पाहायला मिळत आहे..

अहो दादा बिहारमध्ये पण औरंगाबाद नावाचं शहर आहे असं म्हणतात. त्याबद्दल भाजप सरकार काही बोलणार आहे की नाही? असं मोघलांसारखं काय बोलता. आम्ही “छत्रपती संभाजी महाराजांचं” नाव विमानतळाला देणाऱ्या प्रस्तावास केंद्र सरकारने अजून मंजुरी का दिली नाही?, असं म्हणत अमोल मिटकरींनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधलाय.

दरम्यान, अहमदाबाद शहराचं नाव कर्णावती करुन दाखवा, असं आव्हान राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपला केलं होतं. त्याला चंद्रकांत पाटलांनी प्रत्युत्तर दिलं. त्यावरुन आता अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“ठाण्याची श्रुतिका माने ठरली ऑस्ट्रेलियाची ‘मिस इंडिया’!”

अहमदाबादचं कर्णावती करायला माझी काहीच हरकत नाही, पण…; चंद्रकांत पाटलांचं अमोल मिटकरींना प्रत्युत्तर

“सगळं नीट “ठरलंय” ना?…नाहीतर पुन्हा धनुष्यबाणाची घड्याळ बघून घाई आणि हात म्हणायचा नाही-नाही!”

औरंगजेब तुमचा आदर्श आहे का?; शिवसेनेचा काँग्रेसला सवाल