आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सिंधुदुर्ग : कणकवली येथे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेण्या चाकू हल्ल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच या घटनेचे प्रतिसाद शिवसैनिकात उमटले असून या शिवसैनिकांनी कणकवली पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला.
हे ही वाचा : …त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते; चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारला इशारा
मोर्चा काढून यावेळी शिवसैनिकांनी भाजप आमदार नितेश राणे यांना अटक करण्याची मागणी करत ‘बाबा मला वाचव, कॉक कॉक कॉक कॉक’ अशा घोषणा देत नितेश राणेंची खिल्ली उडवली आहे. तसेच या मोर्चानंतर कणकवलीत तणावाचं वातावरण निर्माण झालं असून याबाबत वरिष्ठ पोलीस उप अधीक्षक कार्यालयात बैठक झाली. मात्र या बैठकीत कोणता निर्णय झाला, हे अद्याप समजलेलं नाही.
दरम्यान, संतोष परब यांच्यावर हल्ला करणारा मुख्य आरोपी सचिन सातपुते याला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली असून नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात असून पोलिसांनी तीन ठिकाणी फिल्डींग लावल्याची माहिती समोर येत आहे.
महत्वाच्या घडामोडी –
नितेश राणेंवर कारवाई करा, अन्यथा…; शिवसेनेचा इशारा
आता वडेट्टीवारांनी शिवरायांचा अपमान केला?; भाजपचा आरोप
भाजप कार्यकर्त्यांवरील अटकसत्र थांबवा, अन्यथा…; नारायण राणेंचा इशारा