आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याचा आरोप शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गोरेगावातील नेस्को मैदानावर हिंदी भाषी महासंकल्प सभेमध्ये जोरदार उत्तर दिलं.
शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबईची किती वाट लागली, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आमच्या सरकारच्या काळात मुंबईच्या विकासासाठी सुरू केलेल्या सर्व योजना व प्रकल्प ठाकरे सरकारच्या काळात ठप्प झाले आहेत. परिणामी मुंबईकरांना त्याचे परिणाम भोगावे लागत असल्याची टीका देवेंद्र फडणवीसांनी कालच्या सभेत केली. यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा : तिला मानसिक उपचाराची गरज; केतकी चितळेवर अजित पवार संतापले
उताराला लागलेली गाडी आणि वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेता यांना ब्रेक लागणे कठीण असते. अपघात अटळ आहे., असं ट्विट करत संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे.
उताराला लागलेली गाडी आणि वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेता यांना ब्रेक लागणे कठीण असते.
अपघात अटळ आहे.— Sanjay Raut (@rautsanjay61) May 16, 2022
महत्वाच्या घडामोडी –
‘उद्धव ठाकरे बाबरी मशिदीवर उभे झाले असते तर…’; नितेश राणेंची टीका
…. म्हणून सुप्रिया सुळेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे मानले आभार, म्हणाल्या…
“आधी पुणे शहराध्यक्षपदावरून आणि आता…; मनसेचा वसंत मोरेंना पुन्हा एक धक्का”