मुंबई : सध्या संपूर्ण जग करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहे. भारतातही या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी अनेक उपायोजना करण्यात येत आहेत. तर महाराष्ट्रात सुद्धा कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 63 वर पोहचली आहे. राज्यातील कोरोनोच्या वाढत्या रुग्ण संख्यावरून भाजपचे नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रात कशाचाच कशावर अंकुश व नियंत्रण नाही. सकाळी पत्रकार परिषद घेतली म्हणजे मुख्यमंत्र्यांचं काम संपलं. राज्यात सॅनिटायझर आणि मास्कचा काळाबाजार सुरु आहे. त्यामुळे धाडसी निर्णय घेणारा माणूस अर्धवट निर्णय घेत नाही, असं ट्विट करत निलेश राणेंनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
महाराष्ट्रात कशाचा कशावर अंकुश व नियंत्रण नाही. सकाळी पत्रकार परिषद घ्यायची की काम संपलं मुख्यमंत्र्यांचं. काल परवा पर्यंत मुंबईत काेरोना रुग्ण एअरपोर्ट वरून घरी (बोरिविली) गेलेच कसे? Sanitizer व mask चा काळा बाजार जोरात आहे. धाडशी निर्णय घेणारा माणूस अर्धवट निर्णय घेत नाही. https://t.co/cukKj5qnGZ
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 21, 2020
दरम्यान, आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री कसली वाट बघत आहेत? हे सरकार रोज कोरोना रुग्ण किती वाढतायत ह्याची माहिती देण्यासाठीच आहे काय? विचार करण्यात आणि बोलण्यात वेळ जितका घालवाल तितका त्रास लोकांना भोगावा लागेल, असंही निलेश राणे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
शरद पवार यांच्या संस्कारामुळे जबाबदारीला प्राधान्य- राजेश टोपे
जातियवादाच्या कोरोनाव कधी आळा बसणार- रामदास आठवले
“सध्या महाराष्ट्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची नाही तर देवेंद्र फडणवीसांची गरज”
मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिली दिलासा देणारी ‘ही’ मोठी बातमी