Home महाराष्ट्र “कायदा बनल्यानंतर त्याचे श्रेय घेणारे आज म्हणतात की, कायदा ‘फुलप्रूफ’ नव्हता! किती...

“कायदा बनल्यानंतर त्याचे श्रेय घेणारे आज म्हणतात की, कायदा ‘फुलप्रूफ’ नव्हता! किती हा दुटप्पीपणा?”

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहिलेलं पत्र राज्यपालांकडे सुपूर्द केलं. तसेच यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या कायदा फुल प्रुफ असल्याच्या केलेल्या वक्तव्यावर देखील भाष्य केलं. यावर फडणवीसांनी देखील प्रत्युत्तर दिलं.

मराठा आरक्षणाचा कायदा तयार करताना आमच्यासोबत असलेले आणि कायदा बनल्यानंतर त्याचे श्रेय घेणारे आज म्हणतात की, कायदा ‘फुलप्रूफ’ नव्हता! किती हा दुटप्पीपणा? , असं ट्विट करत फडणवीसांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं.

मग प्रश्न उपस्थित होतो की, भाजपा सरकारच्या काळात हाच कायदा हायकोर्टात वैध ठरतो आणि सर्वोच्च न्यायालय सुद्धा स्थगिती देण्यास नकार देते…. आणि नव्या सरकारच्या काळात स्थगिती मिळते आणि कायदाही अवैध ठरतो. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी कोण? असा प्रश्न फडणवीसांनी यावेळी उपस्थित केला.

महत्वाच्या घडामोडी –

“जायचंय पंढरपूरला पण गाडी निघाली गोव्याला असा मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा आघाडी सरकारने केला”

…आता पुढचा नंबर अनिल परब यांचा लागणार; किरीट सोमय्यांचा इशारा

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही लवकरच पंतप्रधानांची भेट घेणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“उत्तर प्रदेशात रामराज्य आलं आणि सरकारने लोकांना रामभरोसे सोडून दिलं”