आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
राज्याच्या झालेल्या नगरपंचायती निवडणुकांच्या निकालावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेना आणि भाजपाची छुपी युती असल्याचा आरोप केला होता. त्यावरुन भाजपा नेते गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर टीका केली आहे.
“बोदवड नगरपंचायतीबाबतीत एकनाथ खडसे यांना काय म्हणायचं ते म्हणू द्या. विधानसभेत एकनाथ खडसे पडले; खरं तर ते मुख्यमंत्री यांच्या शर्यतीत होते. बोदवडमध्ये हारले तर आता कारणं कशाला सांगत आहात. मोठ्या मनाने सांगाना आम्ही हरलो. ज्याच्यात दम आहे तो निवडून येतो. मुक्ताईनगरमध्ये त्यांचे सरकार नाही, त्यांच्या गावात त्यांचे सरकार नाही. काही कारणं सांगायची आणि आपली पुंगी वाजायची असा प्रकार खडसे यांचा सुरू, असं गिरीश महाजन म्हणाले आहेत.
हे ही वाचा : ध्वजारोहणावेळी आदित्य ठाकरे व रश्मी ठाकरेंनी आचारसंहितेचा भंग केला- अॅड. जयश्री पाटील
दरम्यान, “एक जागा ईश्वरचिठ्ठीने आणि एक जागा सहा मतांनी गमावली आहे. पण शेवटी पराभव तर पराभवच आहे. भाजपा आणि शिवसेनेची छुपी युती होती. गिरीश महाजन आणि शिवसेनेच्या स्थानिक आमदारांमध्ये तीन दिवसांपूर्वी चर्चा झाली. पेपरमध्ये फोटोही आले आहेत. त्यामुळे फक्त राष्ट्रवादीचा पराभव करा या हेतूने सर्व पक्ष एकत्र आले होते. तरीही आम्हाला चांगलं यश मिळालं आहे. ईश्वचिठ्ठीमुळे दुर्दैवाने गेलो नाहीतर बहुमतापर्यंत आलो असतो. पण हा पराभव का झाला याचं चिंतन करण्याची गरज असून आम्ही ते करु,” असं एकनाथ खडसे म्हणाले होते.
महत्वाच्या घडामोडी –
‘…अशा पुड्या सोडण्याची जयंत पाटील यांना सवयच’; चंद्रकांत पाटलांचा टोला
“जळगावमध्ये गुलाबराव पाटील गिरीश महाजनांच्या घरी, शिवसेना-भाजप युतीच्या चर्चांना उधाण”
टिपू सुलतान नावाच्या वादावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले….