आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नवी दिल्ली : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यानंतर निवडणूक आयोगाने आता राष्ट्रवादी काँग्रेसलाही मोठा धक्का दिला आहे.
निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे, त्यामुळे आता राष्ट्रवादी राष्ट्रीय पक्ष राहणार नाही. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीला महाराष्ट्राबाहेर घड्याळ, या चिन्हावर निवडणूक लढता येणार नाही.
ही बातमी पण वाचा : “ठाण्यातील शिवसेनेच्या बालेकिल्यातील ‘हा’ मोठा नेता उद्धव ठाकरेंच्या भेटीला, चर्चांना उधाण”
एखादा राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा मिळण्यासाठी, लोकसभा निवडणुकीवेळी चार किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांमध्ये 6 टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळतात. याशिवाय पक्षाला लोकसभेच्या एकूण जागांच्या 2 टक्के म्हणजेच तीन राज्यांमधून 11 जागा जिंकाव्या लागतात.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीला इतर राज्यांमध्ये पुढच्या निवडणुका घड्याळ या चिन्हावर लढता येणार नाहीत. पण राष्ट्रवादीला महाराष्ट्रातला प्रादेशिक पक्ष म्हणून दर्जा असल्यामुळे त्यांना महाराष्ट्रात घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढता येईल.
महत्त्वाच्या घडामोडी
ठाकरे गट-शिंदे गट एकत्र येणार?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर, म्हणाले…
शरद पवार त्यांच्या नावाप्रमाणे पावरफूल नेते आहेत – चंद्रकांत पाटील
एकनाथ शिंदेंनी, दोनदा शिवसेना सोडली, मात्र त्यावेळी त्यांना…; ‘या’ नेत्याचा मोठा गाैफ्यस्फोट