आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : माजी मंत्री आणि काग्रेसचे आमदार अस्लम शेख यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी गंभीर आरोप केले होते. यानंतर आता आमदार अस्लम शेख यांना राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाने मढ- मार्वे स्टुडिओ प्रकरणी नोटीस जारी केली आहे.
हे ही वाचा : “सत्तांतर झाल्यापासून अजित पवारांना राजकारण कमी, भविष्यवाणी अधिक कळू लागलीये”
शेख यांनी कोरोना काळात मलाड पश्चिमेकडील मढच्या समुद्रात बांधकामास मदत केली. त्यांनी मढ परिसरात तब्बल 28 फिल्म स्टुडिओचे कमर्शियल बांधकाम सुरू केले आहे. त्यातील पाच स्टुडिओ हे सीआरझेड झोनमध्ये येत आहे. तसेच यात 1000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. या प्रकरणी मुंबई महानगरपालिका आणि जिल्हा अधिकारी यांनी कठोर कारवाई करावी, असे आदेश या नोटीसद्वारे करण्यात आले आहेत.
दरम्यान, त्यामुळे अस्लम शेख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
मनसेत पक्ष प्रवेशाचा धुमधडाका सुरुचं; अनेक युवक कार्यकर्त्यांनी हाती धरला मनसेचा भगवा झेंडा”