Home महाराष्ट्र रूपाली पाटील यांच्यानंतर बाळा नांदगावकरही पक्ष सोडणार?; सोशल मीडियावर रंगल्या चर्चा

रूपाली पाटील यांच्यानंतर बाळा नांदगावकरही पक्ष सोडणार?; सोशल मीडियावर रंगल्या चर्चा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष रुपाली पाटील- ठोंबरे यांनी आपल्या सर्वपदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर आता  मनसेचा आणखी एक मोठा नेता शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे निवडणुकांच्या तयारीसाठी महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. राज ठाकरेंचा दौरा आता पुण्यात असून त्यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहणारे बाळा नांदगावर हे पुणे दौऱ्यात त्यांच्यासोबत नसल्यामुळे बाळा नांदगावकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या आहेत. मात्र बाळा नांदगावर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

हे ही वाचा :  ओबीसी आरक्षण कायमचं गोठविण्याचा ठाकरे सरकारचा कट; भाजपचा आरोप

दरम्यान, “मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नाशिक, औरंगाबाद आणि पुणे दौरा सुरू आहे. नाशिक आणि औरंगाबाद दौऱ्यात मी राज ठाकरे यांच्यासोबत होतो. राज ठाकरे पुण्यात आले तेव्हा मी मुंबईला परतलो. कारण, मुंबईत 18 तारखेला माझ्या मतदारसंघात साहेबांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन होणार असल्यामुळे त्या तयारीसाठी मी मुंबईत आलो आहे, असा खुलासा बाळा नंदगावर यांनी यावेळी केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

‘बैलगाडा शर्यतीचं श्रेय कोणाचं?’; आढळराव पाटलांचा अमोल कोल्हेंवर निशाणा, म्हणाले…

रोहित पाटलांच्या ’25 होईपर्यंत काही शिल्लक ठेवत नाही’च्या भाषेवर अजित पवार म्हणाले…

“पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्याच्या घरी घेतला जेवणाचा आस्वाद”