Home महाराष्ट्र “राष्ट्रवादी शरद पवार गटानंतर, आता अजित पवारांनीही जाहीर केली यादी; ‘या’ नेत्यांना...

“राष्ट्रवादी शरद पवार गटानंतर, आता अजित पवारांनीही जाहीर केली यादी; ‘या’ नेत्यांना दिली संधी”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी प्रत्येक पक्ष जोरदार तयारीला लागला आहे. जागावाटपाची चर्चा सुरू आहे.

अशातच भाजप, महाविकास आघाडीतल्या राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस, शिवसेनेने यादी जाहीर केल्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटानेही आपली उमेद्वारी यादी जाहीर केली आहे.

ही बातमी पण वाचा – “भाजप, ठाकरे गट, पवार गटानंतर आता काँग्रेसची पहिली यादी जाहीर, ‘या’ उमेदवारांना मिळाली संधी”

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने जाहीर केलेल्या 21 जणांच्या यादीमध्ये कोणाकोणाला संधी मिळाली ते वाचा :

  1. अजित पवार (बारामती)
  2. छगन भुजबळ (येवला)
  3. दिलीप वळसे पाटील (कोरेगाव)
  4. हसन मुश्रीफ (कागल)
  5. धनंजय मुंडे (परळी)
  6. नरहरी झिरवाळ (दिंडोरी)
  7. धर्मराज बाबा आत्राम (अहेरी)
  8. आदिती तटकरे (श्रीवर्धन)
  9. अनिल भाईदास पाटील (अंमळनेर)
  10. संजय बनसोडे (उदगीर)
  11. राजकुमार बडोले (अर्जुनी बोरगाव)
  12. प्रकाश दादा सोळंके (माजलगाव)
  13. मकरंद पाटील (वाई)
  14. माणिकराव कोकाटे (सिन्नर)
  15. दिलीप मोहिते (खेड आळंदी)
  16. संग्राम जगताप (अहमदनगर शहर)
  17. दत्तात्रय भरणे इंदापूर
  18. बाबासाहेब पाटील (अहमदपूर)
  19. दाैलत दरोडा (शहापूर)
  20. अण्णा बनसोडे (पिंपरी)
  21. नितीन पवार (कळवण)

महत्त्वाच्या बातम्या –

98 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी तारा भवाळकर यांची निवड; पुणे अर्बन सेलच्या वतीने केला सत्कार

निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना मोठा धक्का! ‘या’ मोठ्या नेत्यांसह कार्यकर्त्यांचे राजीनामे

भाजपच्या पहिल्या यादीत पुण्यातील तीन आमदारांना पुन्हा उमेदवारी, तर दोन विद्यमान आमदारांचा पत्ता कट