Home महाराष्ट्र मनसेनं शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांचे फोटो शेअर केल्यानंतर, आता राष्ट्रवादीची...

मनसेनं शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांचे फोटो शेअर केल्यानंतर, आता राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत बोलताना राज ठाकरे यांनी तूर्तास अयोध्य दौरा स्थगित करत असल्याचं म्हटलं.

या सभेत बोलताना राज यांनी आपल्या अयोध्या दाैऱ्यास विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली, असा आरोप केला होता. अशातच आता मनसेकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बालिशपणा म्हणायचं की पोरकटपणा म्हणायचं मला कळत नाही. आम्ही कुठेच राज ठाकरेंबद्दल वक्तव्य केलं नाही. सर्व सभांमध्ये त्यांनी शरद पवारांविरोधात वक्तव्य केलं. त्यांच्याकडून महाराष्ट्राला फार मोठ्या अपेक्षा होत्या. पण तिन्ही भाषणं पाहिली तर आपल्याबद्दल, पक्षाबद्दल, भूमिकेबद्दल न बोलता राष्ट्रवादीने, शरद पवारांनी काय केलं याबद्दल बोलत होते, असं महेश तपासे म्हणाले.

हे ही वाचा : या सरकारला महाविकास आघाडीचे सरकार म्हणायचे नाही, तर…; रावसाहेब दानवेंची टीका

राज ठाकरेंनी अयोध्या दौरा जाहीर केल्यानंतर बृजभूषण सिंह यांनी विरोध केला. ते भाजपाचे खासदार आहेत, राष्ट्रवादीचे नाही. राज ठाकरेंनी योगी आदित्यनाथ यांच्यासंदर्भात स्तुतीसुमनं उधळली असताना ते मात्र यावर एक शब्द बोलले नाहीत. मुख्यमंत्री असताना राज्यात येणाऱ्या व्यक्तीला सुरक्षा ते देऊ शकत होते. स्वत:च्या पक्षाच्या खासदाराला ते आवरु शकले नाही.,असं देखील महेश तपासे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

“कुुछ फोटो अच्छे भी होते है, म्हणत मनसेकडून पवार कुटूंब व भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचे फोटो शेअर, चर्चांना उधाण”

 मुंबईत शिवसेनेला हरवायचं, हेच आमचं मुख्य टार्गेट- रामदास आठवले

“इंधन दरकपातीवरून देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले, उंटाच्या तोंडात…”